आरोग्य

दह्याचे आरोग्यासाठी फायदे

1) दुधापासून दही बनण्याच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये दुधातील कोणत्याच घटकांचा नाश होत नाही. त्यातील अनेक महत्त्वाचे घटकांचे पोषणमूल्य वाढते.

2) दुधातील नत्रज पदार्थ हे वाढलेल्या आम्लतेमुळे सहज विघटित होण्याच्या अवस्थेत येत असल्याने त्यांचे जठरात लवकर शोषण होऊ शकते.

3) दुधातील कॅल्शिअम व फॉस्फरस हे सामान्यतः प्रथिनांसोबत जोडलेले असतात, ते दही बनताना वाढलेल्या आम्लतेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित होऊन आतड्यांत लवकर शोषले जातात.

4) अविघटित राहिलेली दुग्ध शर्करा मोठ्या आतड्यातील लॅक्टिक आम्ल उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस मदत करते. अनावश्यक वायू व विषारी पदार्थ उत्पन्न करणाऱ्या अन्य सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीत अडथळा निर्माण करतात.

5) मुख्यतः दुधातील लॅक्टोज या दुग्ध शर्करेची ॲलर्जी असल्यामुळे दूध न पचण्याची तक्रार असलेल्या लोकांना दह्यातून दुधाची बहुतांश ७ सर्व पोषणतत्त्वे मिळू शकतात.

6) लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आम्लात झाल्यामुळे दही पचण्यास सोपे असते, पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता या सारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात.

7) दह्यातील मुबलक कॅल्शिअम आणि पोटॅशिअममुळे हाडे, दात मजबूत राहतात. हाडे ठिसूळ न होता ऑस्टिओफोरासिसचा धोका कमी होतो.

8) दह्यात विविध जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन बी) व खनिजे भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

9) रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

१०) दह्यात प्रथिने भरपूर असून, त्यामुळे भूक नियंत्रित राहते. पर्यायाने वजन आटोक्यात राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

15 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

15 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

1 दिवस ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

1 दिवस ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

1 दिवस ago