भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो. अशात हिंग खाण्याचे काय काय फायदे होतात आणि हिंग खाण्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेऊया.
हिंग खाण्याचे फायदे
सगळ्यात आधी तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी हिंग खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. हेल्थ एक्सपर्ट ल्यूक कॉटिन्हो सांगतात की, तुमच्या किचनमध्ये एक चमत्कारी मसाला ठेवला आहे. जो अनेकदा गॅस, पोट फुगणे आणि अन्न पचनासाठी वापरला जातो. पण या मसाल्याचे केवळ इतकेच फायदे नाहीत. इतरही अनेक फायदे होऊ शकतात.
गॅस, अॅसिडिटी आणि ब्लोटिंग
काही लोकांना नेहमीच राजमा, चने, शेंगा, डाळी, कोबी खाल्ल्यावर गॅसची समस्या होऊ लागते. यासोबतच ब्लोटिंग आणि अॅसिडिटी सुद्धा होते. हिंगामध्ये कार्मिनेटिव तत्व असतात, जे अन्न पचन सहजपणे होण्यास मदत करतात. यासाठी हिंगाचा वापर तीन पद्धतीने करू शकता.
हिंग खाण्याच्या तीन पद्धती
जेवण बनवताना चिमुटभर हिंग टाका
डाळी, राजमा, छोले, चने, शेंगदाणे भिजवताना त्यात चिमुटभर हिंग टाका
जेवण केल्यावर ३० मिनिटांनंतर एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हिंग टाकून पिऊ शकता
डायबिटीज-हाय बीपीमध्ये फायदेशीर
जेवणामध्ये हिंग टाकण्याचे अनेक फायदे आहेत. हा अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-डायबिटीस, अॅंटी-स्पासमेडिक, कार्मिनेटिव, अॅंटी-वायरल, अॅंटी फंगल आणि अॅंटी हायपरटेंसिव असे महत्वाचे तत्व असणारा मसाला आहे. अनेक शोधातूनही समोर आलं आहे की, हा मसाला पोट आणि फुप्फुसांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
हाय बीपीत कसा करतो मदत
हिंग खाल्ल्यानंतर यातील तत्व शुगर आणि बीपी विरोधात लढू लागतात. यानं रक्त पातळ करण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि नंतर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
कोणत्या समस्येत हिंग कसा खावा
डोकेदुखी, मायग्रेन, मेंस्ट्रुअल क्रॅम्पमध्ये चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा मेथीचे बारीक केलेले दाणे एक ग्लास कोमट पाण्यात किंवा ताकात टाकून हळूहळू प्या. ब्लोटिंग, गॅसची समस्या दूर करण्यासाठी जेवण केल्यावर ३० मिनिटांनी चिमुटभर हिंग एक ग्लास कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता. अस्थमा, न्यूमोनिया, ब्रोंकायटिसची लक्षणं कमी करण्यासाठी १ चमचा हिंगाची पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट छातीवर लावा आणि २ तासांसाठी तशीच राहू द्या. त्यानंतर पाण्यानं धुवून घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)