प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरूवात एनर्जीने आणि फ्रेश करायची असते. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, डोकं दुखतं आणि पोटात जडपणा वाटतो. जास्तीत जास्त लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही चांगला जात नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या काही खाण्यामुळेही होतात.
रात्री झोपण्याआधी काय खाव
जर तुम्ही रोज रात्री जेवणानंतर आणि झोपण्याआधी बडीशेप खाण्याची सवय लावली तर तुम्हाला वरील कोणत्याही समस्या होणार नाहीत. रात्री बडीशेप खाऊन झोपल्यानं काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
पचन चांगलं होत: बडीशेप पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी खूप फायदेशीर असते. बडीशेपच्या छोट्या छोट्या दाण्यांमध्ये गॅस्ट्रिक एंझाइम्स असतात, जे पचनास मदत करतात. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडीशी बडीशेप खाल तर पचनक्रिया चांगली होईल. तसेच रात्री गॅस, अॅसिडिटी किंवा जडपणा अशा समस्याही होणार नाहीत.
झोप चांगली लागेल: पोट जर हलकं अशेल आणि पचन चांगलं झालं तर झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते. बडीशेपमध्ये मॅग्नेशिअम असतं. स्नायू सुद्धा रिलॅक्स राहतात. यामुळे झोप चांगली लागते. रात्री जर झोप चांगली झाली तर सकाळी तुम्हाला फ्रेश वाटतं.
पोट साफ होत: रात्रीच्या जेवणानंतर जर बडीशेपचं दाणे खाल्ले तर आतड्या अॅक्टिव राहतात आणि पचनक्रिया चांगली होते. याचा प्रभाव सकाळी दिसतो. रात्री पचनक्रिया चांगली झाली तर सकाळी पोटही सहजपणे साफ होतं. ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं आणि फ्रेशही वाटतं.
तोंडाची दुर्गंधी जाते: रात्री बडीशेप खाऊ झोपल्यानं तोंडाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. बडीशेपमध्ये नॅचरल अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे तोंडाची दुर्गंधी दूर करतात आणि बॅक्टेरिया नष्ट करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…