आरोग्य

कानात चिकटून बसलेला मळ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय

कानात मळ होण ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ कठोर होतात. अशात कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात.

१) गरम पाणी आणि कापडाचा वापर 

गरम पाणी कान साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे. एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात एक कापड भिजवा. कापड पिळून हळुवारपणे कानाच्या बाहेरचा भाग पुसून घ्या. कानात पाणी जाऊ देऊ नका. याने कानाच्या बाहेरील भागात असलेला मळ साफ होण्यास मदत मिळेल.

२) ऑलिव्ह ऑईल 

ऑलिव्ह ऑईल कानातील मळ नरम करणे आणि बाहेर काढण्याचा एक नॅचरल उपाय आहे. याने कानाच्या आतील सूजही कमी होते. यासाठी या तेलाचे काही थेंब कानात टाका आणि डोकं काही वेळासाठी एका बाजूला झुकवा. जेणेकरून तेल कानात आतपर्यंत जाईल. ५ ते १० मिनिटांनी कान हळुवारपणे पुसून घ्या. याने कानातील मळ बाहेर येईल.

३) खोबऱ्याचं तेल 

खोबऱ्याचं तेलही एक चांगला पर्याय आहे. खासकरून जर कान खाजवत असेल किंवा जळजळ होत असेल. तेलाचे काही थेंब हलकं गरम करून कानात टाका. काही वेळासाठी डोकं एका बाजूला झुकवा. याने कानातील चिकटून बसलेला मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.

४) मिठाचं पाणी 

मिठाचं पाणी कानाची सफाई करण्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित उपाय मानला जातो. एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिक्स करा. नंतर रूई मिठाच्या पाण्यात भिजवा आणि त्याने कानाच्या बाहेरील भागावर पाणी लावा. याने कानाच्या आतील मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

2 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

15 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

21 तास ago