आरोग्य

सारखं डोकं दुखत असल्यास करा काही सोपे व्यायाम

बरेच लोक असे असतात की त्यांचं सतत डोकं दुखतं. खाण्यापिण्यात थोडे बदल झाले, झोपेच्या वेळा बिघडल्या की त्यांचं लगेच डोकं ठणकायला लागतं, डोकं दुखण्यासाठी त्यांना कोणतंही छोटंसं कारण पुरेसं होतं. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थाेडे जास्तच आहे. स्वयंपाक घरातले सततचे आवाज, लहान मुलांचा गोंधळ ही सगळी कारणंही त्यामागे आहेतच.

डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे

डोकेदुखी थांबविण्यासाठी डोक्याजवळचे स्नायू रिलॅक्स करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या दोन्ही भुवया बोटांनी पकडा आणि त्यानंतर त्या वर- खाली या पद्धतीने हलवा. त्यानंतर बाहेरच्या बाजुने ओढा व पुन्हा आतल्या बाजुने ओढा.

दोन्ही भुवयांच्या मधे जो भाग असतो त्या भागावर बोटाने थोडा दाब द्या आणि तो भाग गोलाकार दिशेने फिरवत त्यावर दाब द्या. डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

गालाचे काही व्यायाम करूनही डोकेदुखी कमी होते. त्यासाठी गाल फुगवा. तोंडात पाणी आहे असे समजून चूळ भरल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करा. यामुळे चेहऱ्याच्या काही भागातले स्नायू मोकळे होतात आणि डोकेदुखी कमी होते.

हे व्यायामही तुम्ही करू शकता: डोकेेदुखीचा त्रास होत असेल तर वरील व्यायाम तर तुम्ही करू शकताच, पण त्यासोबतच जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर पुढे सांगितलेली काही योगासनं करून पाहा.

व्रजासन करून कपाळ जमिनीवर टेकविणे.

कॅट- कॉ पोझ

गोमुखासन

मर्कटासन

शवासन

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago