आरोग्य

किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राग नेहमीच मनावर अधिराज्य गाजवतो. तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो का? जर तुमचं उत्तर हो तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे. विशेषतः ते तुमच्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकत. रागाचा परिणाम केवळ मनावर होत नाही तर तो शरीराच्या प्रत्येक भागावरही परिणाम करू शकतो. त्याचा हृदयावर सर्वात जास्त परिणाम होतो. जास्त रागावल्याने हार्ट ॲटॅकचा धोकाही वाढतो.

जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपले शरीर तणावग्रस्त स्थितीत जातं. वाढलेलं एड्रेनालाईन आणि कॉर्टिसोलसारखे हार्मोनल बदल ब्लड प्रेशर वाढवतात. यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर हृदयावर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढू शकतो.

ब्लड प्रेशर वाढत

रागाच्या वेळी शरीरात एड्रेनालाईनची लेव्हल वाढते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वेगाने वाढतं. जर हे वारंवार घडत राहिलं तर हृदयावरील दाब वाढतो आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त काळ हाय ब्लड प्रेशर राहिल्याने हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

रक्ताच्या गुठळ्या तयार होण

रागाच्या भरात रक्तप्रवाह वाढतो आणि प्लेटलेट्स लवकर एकत्र चिकटू लागतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, जो हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो. या गुठळ्यांमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो.

हृदयाचे ठोके वाढण

जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. जर हे सतत होत राहिले तर हृदयाला जास्त काम करावं लागतं. यामुळे हृदयरोग होऊ शकतात.

राग येऊ नये म्हणून काय कराव

राग आल्यावर दीर्घ श्वास घ्या, यामुळे हृदय शांत होण्यास मदत होते. नियमित व्यायाम करा, त्यामुळे ताण कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.

मेडिटेशनमुळे मानसिक शांती मिळते, ज्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सकारात्मक विचारसरणी स्वीकारा. विश्रांती घ्या, जेणेकरून तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी राहू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

15 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago