मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्या उद्भवू शकतात. कानातला मळ काढण्यासाठी काही खास ट्रिक्स वापरल्यास तुमचं काम सोपं होईल.
कानात मळ का तयार होतो.
कानात तयार होणारा मळ म्हणजेच इयर वॅक्स शरीरातील एक नॅच्युरल प्रक्रिया आहे. इअर वॅक्समुळे कानांना धूळ, माती आणि किटाणूंपासून बचाव करण्यास मदत होते. पण जेव्हा जास्त मळ कानात जमा होतो तेव्हा त्रास होतो. लहान मुलांना कानात खाज येणं, वेदना, ऐकायला कमी येणं अशा समस्या उद्भवतात.
या गोष्टींची काळजी घ्या
लहान मुलांचे कान साफ करताना इयर बड्स, बोट, पिंन्स, कापूस असे पदार्थ कानात घालू नयेत. असं केल्यानं वॅक्स आतमध्ये ढकललं जाऊ शकतं. ज्यामुळे कानांचा पडदा खराब होऊ शकतो. याव्यतिरिक्त कानांमध्ये इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि मुलांना लहान वयातच कमी ऐकू येऊ लागतं.
कानांचा मळ कसा स्वच्छ करायचा.
कानात जास्तच मळ साचला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा मळ साफ करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. एक छोटा, स्वच्छ कपडा घ्या. कोमट पाण्यात भिजवून हलका पिळून घ्या. कापडानं मुलांच्या कानातील बाहेरचा भाग हळूहळू स्वच्छ करा. ज्यामुळे मळ सैल होईल आणि आपोआप बाहेर निघेल.
कानात वेदना, खाज, सूज, ऐकायला त्रास होणं अशा समस्या असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. कधी कधी मळ जास्त जमा झाल्यामुळे टुल्स किंवा इयर ड्रॉप्सची आवश्यकता असते. पीडियाट्रिशियन सांगतात की लहान मुलांचे कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कानात कोणतीही वस्तू घालू नये. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…