आरोग्य

हाय बीपीचा त्रास होत असल्यास ‘या’ तेलाने करा मसाज

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

पायांची दुखणे वाढल्यावर तळव्यांना तेल लावून मसाज करा. यासाठी आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. मोहरीच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात.

स्नायूंना आराम आणि वेदनेपासून दूर

मोहरीचे तेल लावून तळव्यांना मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. यासह नसांवरही सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे पाय किंवा इतर दुखणे दूर होतात. जर आपल्याला पाय किंवा सांधे दुखण्याची समस्या असेल तर, तळव्यांना मोहरीचे तेल लावून मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

झोपेचं चक्र सुधारते

तळवे मसाज करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झोप सुधारते. जर आपलं बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेचं चक्र बिघडलं असेल तर, रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि गाढ झोप येण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

मोहरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जे आपण तळव्यांना तेल लावून मसाज करता, तेव्हा ते शरीरात उष्ण निर्माण करतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.

त्वचेसाठी फायदेशीर

मोहरीचे तेल त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. नियमित मसाज केल्याने तळव्यांची त्वचा मऊ आणि निरोगी राहते. हे तेल मृत त्वचा काढून टाकण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago