आरोग्य

पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने…

कोणते पौष्टिक पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने

१) पालक रस: पालक आपल्या नेहमीच्या जेवणात खातोच. पण काहीजण हेल्दी म्हणून पालकाच्या पानांचा रस देखील पितात. परंतु पालकाच्या पानांचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात, म्हणूनच कच्च्या पालकाच्या पानांचा थेट रस न पिता सर्वातआधी पालकांना हलकेच उकळवा आणि नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. यामुळे त्यांची पौष्टिक गुणवत्ता सुधारेल आणि त्यातील महत्वाची आवश्यक ती पोषक तत्वे शरीर सहजपणे शोषून घेईल. यामुळे जर तुम्हाला पालक खायचाच असेल तर तो अधिक उकडवून घ्यावा आणि मगच तो खावा.

२) कच्ची कडधान्य: कडधान्य पौष्टिक म्हणून जर तुम्ही ती कच्चीच खात असाल तर हे चुकीचे आहे. कच्ची कडधान्य वारंवार खाल्ल्यांस आपल्याला पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कडधान्य खाताना त्यांना हलकेच वाफ देऊन ती उकडवून खावीत. यामुळे ही कडधान्य सहजपणे पचवणे सोपे जाते. परिणामी, पचनासंबंधिचे अनेक प्रॉब्लेम्स दूर होतात.

३) अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर: आजकाल भरपूर लोक अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हेल्दी म्हणून पितात. वजन कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायले जाते. परंतु जर तुम्ही ते थेट पीत असाल तर ते तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवू शकते. एवढंच नाही तर दातांवरील एनॅमलच्या थराचे देखील नुकसान होऊ शकते. यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना ते थेट न पिता पाण्यांत मिक्स करूनच प्यावे. त्याचबरोबर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना स्ट्रॉचा वापर करावा यामुळे दातांचे संरक्षण होऊन आतड्यांवर देखील फायदेशीर परिणाम करेल.

४) भरड धान्यांची चपाती: आजकाल हेल्दी म्हणून किंवा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरड धान्यांपासून तयार करण्यात आलेली चपाती खाल्ली जाते. या भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा समावेश होतो. परंतु या भरड धान्यांमध्ये ग्लूटेन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे ही भरड धान्य पचनाला थोडी जड असतात, यामुळे आपल्याला गॅसेसचा त्रास देखील होऊ शकतो. यामुळे भरड धान्यांची चपाती खाताना नेहमी त्यावर तूप लावून मगच खावे. तूप लावल्याने असे पदार्थ सहजपणे पचण्यास मदत होते आणि ते खाताना देखील त्यांची चव अधिक चांगली लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago