आरोग्य

मुरूम, खाज, लाल चट्टे व इतर स्किन अ‍ॅलर्जी झाल्यास ट्राय करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जीपेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जीमध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ लागतात.

स्किन अ‍ॅलर्जी खास करून तेव्हा होते जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी अशा गोष्टीच्या संपर्कात येते ज्यासाठी इम्युन सिस्टम त्याला रोखण्यासाठी अ‍ॅंटीबॉडीज रिलीज करते. बहुतांश वेळी ही अ‍ॅलर्जी सामान्य असते तर काही वेळेस गंभीर असते. तर काही अ‍ॅलर्जी या जुन्या असतात ज्या औषधांमार्फत दूर केल्या जाऊ शकतात.

बेकिंग सोडा: स्किन अ‍ॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो अनेक समस्यांवर लाभदायक ठरतो. पण बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो.

कसा करावा वापर: त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अ‍ॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. अ‍ॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.

कोरफडीचा गर: कोरफडीमधील औषधी गुणधर्मांच्या व्याप्तीबद्दल आपण सारेच जाणून आहोत. कोरफडीचा वापर अनेक गोष्टींत व अनेक प्रकारे केला जातो. कोरफडीचा ज्यूस देखील लोक तितक्याच प्रमाणात वापरतात. स्किन अ‍ॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड एक रामबाम उपाय आहे. जर तुम्हाला अ‍ॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल.

कसा करावा वापर: खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर तुमच्याकडे कोरफडीचे झाड नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणून किंवा अ‍ॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसांत खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.

खोबरेल किंवा नारळ तेल: खोबरेल तेल स्किन केयरसाठी सर्वात उत्तम तेल आहे. यामध्ये मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे अ‍ॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. इतकंच नाही तर नारळ तेल अ‍ॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं.

कसा करावा वापर: एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल त्याजागी लावा जिथे तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली आहे. लक्षात ठेवा, तेल अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी फक्त लावा चुकूनही मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर तुम्ही ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर: अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर लोक सामान्यत: वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेसंबंधित त्रास दूर करण्यासाठी केला जातो. पण हे फक्त वजन कमी करणं किंवा डायजेशन ठीक करण्यासाठीच नाही तर उत्तम स्किन केयर एजंटही आहे. यामध्ये अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड असतं, जे त्वचेवरील खाज व अ‍ॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये.

कसा करावा वापर: एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता.

टी-ट्री ऑइल: टी-ट्री ऑइल मुरूमांपासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्किन अ‍ॅलर्जीमध्येही हे तेल लाभदायक ठरते. यामध्ये अ‍ॅंटीमायक्रोबियल आणि अ‍ॅंटी इन्फ्लमेट्री गुणधर्म असतात, जे कित्येक प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी टी-ट्री ऑइल चांगला उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

5 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

9 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

9 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

9 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

9 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

9 तास ago