आरोग्य

सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही.

तोंड येण्याची कारण

पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं.

पचनाच्या समस्या: पोटातील उष्णता, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटी यासारख्या समस्यांमुळे अनेकदा तोंड येऊ शकतं.

तोंडातील इन्फेक्शन: तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्यास, बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनमुळे तोंड येतं.

ताण: बऱ्याचदा, जास्त ताण देखील तोंड येण्यामागचं कारण असू शकतं.

हार्मोनल बदल: महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदलांमुळे तोंड येऊ शकतं.

फूड इन्फेक्शन: काही पदार्थ आणि पेये, जसे की एसिडिक किंवा मसालेदार पदार्थ, तोंडाला त्रास देऊ शकतात.

सतत तोंड येण्यामुळे होणारे आजार

अशक्तपणा: शरीरात आयरनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे अनेकदा तोंडात फोड येतात.

डायबेटिस: ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे तोंडात इन्फेक्शन आणि अल्सर होऊ शकतो.

सीलिएक आजार: सीलिएक हा एक पचनासंबंधित आजार आहे जो लहान आतड्याला नुकसान पोहोचवतो.

तोंडाचा कॅन्सर: जर एखाद्या व्यक्तीला सतत तोंड येत असेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण देखील असू शकतं.

तोंड येऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

निरोगी आहार घ्या: निरोगी आहारात फळं, भाज्या यांचा समावेश करा.

तोंड स्वच्छ ठेवा: दिवसातून दोनदा ब्रश करा. तोंड स्वच्छ ठेवा.

ताण कमी करा: ताण कमी करण्यासाठी योगा किंवा मेडिटेशन करा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा: धूम्रपान आणि मद्यपान तोंड येऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

2 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

4 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

7 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

16 तास ago