आरोग्य

दही खायचं असेल तर कस खाव

1) बद्धकोष्ठता: ज्यांचा कोठा जड असतो आणि पचनशक्ती क्षीण असते अशांनी दही खाल्ले तर पचनक्रिया मंदावण्याची शक्यता असते. तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात.

२) ॲसिडीटी: दही योग्य वेळी खाल्ले नाही तर ॲसिडीटी होऊ शकते. रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी चांगले नसते, त्याने ॲसिडीटीची समस्या उद्भवते.

३) सांधेदुखी: दह्यामध्ये जे प्रोटीन असते त्यामुळे अंगावर सूज येण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

४) ॲलर्जी: दुधाच्या पदार्थांमुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते. दही हाही दुधाचाच पदार्थ असल्याने काहींना खाज येणे, आग होणे, सूज येणे असे त्रास होऊ शकतात.

५) सर्दी-कफ: दही हे थंड प्रकृतीचे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आधीपासून सर्दी-कफ किंवा खोकला असेल तर ते वाढू शकते.

६) वजनवाढ: एकावेळी खूप जास्त दही खाल्ले तर वजनवाढीसारखी समस्याही होऊ शकते. त्यामुळे दही हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे केव्हाही चांगले.

७) रक्तदाब: विकतचे दही प्रोसेस केलेले असल्याने त्यामध्ये सोडीयम असण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात सोडीयम शरीरात गेले तर रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

दही खायचेच असेल तर

खूप आंबट झालेले फ्रिजमध्ये गार केलेले दही खाऊ नये, आधमोरं म्हणजेच ताजं दही खाणे केव्हाही जास्त चांगले.

दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाऊ नये. त्यापेक्षा दही नुसते खायला हवे.

दह्यापेक्षा ताक पिणे आरोग्यासाठी अधिक चांगले असते, त्याचा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे दह्याचे ताक करावे.

दही साधारणपणे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खावे. सूर्यास्तानंतर दही खाणे टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago