आरोग्य

खोकल्यावर घरगुती उपाय

1) गूळ एक 50 ग्राम किंवा 100 ग्राम घेऊन त्यात थोडं पाणी घालून एक तारी पाक कसा करतो तसा वितळून घ्या त्यात एक मोठा तुकडा आले किसून घाला. त्यातच थोडी कुटलेल्या काळीमिरीची पावडर घाला. चांगले गरम करा. आणि कोमट कोमट जसे सहन होईल तसे चाटा. पण हे झोपताना करा.तरच चांगला आराम होईल. वाटले जरा जास्तच गोड झाले तोंड तर एक घोट गरम पाणी घ्या. एकदम आराम होईल आणि हा उपाय कोणी ही करू शकते. आता याने फरक कसा पडेल या वर बोलु गूळ गरम असतो आले चवीला तिखट काळीमिरी तिखट. हे सर्व एकत्र आले की घशातल्या घाण बॅक्टेरियावर अटॅक करणार. त्या मुळे घशात होणारी खव खव लगेच थांबून शांत झोप येते दुसरी गोष्ट जास्त कफ झाला असेल आणि तो पातळ होत नसेल तर तो या रेमिडी ने पातळ होईल आणि खूप जास्त कफ असेल तर तो टॉयलेट वाटे पडून जाईल. त्या साठी हा उपाय 3 दिवस करा खूप आराम होईल.

2) काही जण तर रोज रात्री झोपताना ग्लासभर दुधात हळद टाकून पितात. ते याचसाठीच आहे एक तर थंडीत गरम दूध चांगले आणि हळद घालून तर अजूनच चांगले. कोणची हाड दुखत असतील तर त्यांनी या दुधात थोडी सुंठ घालून प्यावे. खूप चांगला रिझल्ट येतो. हळद स्किन साठी ही आणि हाडा साठी ही चांगली असते.

3)गूळ सुंठ काळीमिरी आणि आंबे हळद चिमूटभर मीठ गूळ थोडा जास्त. हें एकत्र करून छोट्या छोट्या गोळ्या करा. आणि मध्ये मध्ये चगळत राहा खूप आराम येईल.

4) जे कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांनी झोपताना उकडलेली अंडी थोडी हळद पावडर टाकून खा वरुन नुसती चुळ भरा पाणी पिऊ नये. खूप आराम येईल.

5) खडी साखर धागेवाली जी तुरटी सारखी येते ती चघळत राहा. शुगर वाल्यानी जास्त नको.

6) जेष्ठमध्य कायम घरात असू दे त्याची कांडी चघळत जा.

7) आल्याचा रस काळीमिरी पावडर चिमूटभर हळद मधा मध्ये मिक्स करून चाटण करा.

8) तुळशीच्या पानाचा रस आणि मध एकत्र करून चाटण करा.

9)नॉनव्हेज खात असतील तर मस्त खेकड्याच्या पातळ रस्सा करा आणि प्या एकदम आराम होईल.

10 ) नॉनव्हेज खात असाल तर बकऱ्याचे किंवा गावठी कोंबडीचे सूप करून किंवा पातळ तिखट रस्सा करून प्या एकदम आराम.

11 ) दालचिनी काळी मिरी लवंग. याला चांगले तव्यावर भाजायचे आणि ही पावडर गुळामध्ये किंवा मधामध्ये मिक्स करून चाटायची.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago