आरोग्य

जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ यांचे महत्त्व, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्यात की नाही

एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते ते जाणून घेऊ या.

जीवनसत्त्व ‘ए’

चांगल्या नेत्र दृष्टीसाठी ‘ए’ जीवनसत्त्व महत्त्वाचे असते. तसेच शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता टिकून राहण्यासाठी ‘ए’ जीवनसत्त्व फार गरजेचे असते. प्रजनन संस्थेसाठी ही फार महत्त्वाचे असते. हृदय ,आतडी, किडनी यासाठी ही ‘ए’ जीवनसत्त्वाची फार गरज असते. अंड्यातून मोठ्या प्रमाणात ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. मांसाहारातून जास्त प्रमाणात ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. मग शाकाहारी लोकांनी काय करावं? टॉमॅटो मध्येही ‘ए’ जीवनसत्त्व असतं. पण जर शरीरात ‘ए’ जीवनसत्त्वाची कमी आहे. दृष्टी कमी आहे तर, त्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’च्या गोळ्या मिळतात.

‘बी’ जीवनसत्त्व

‘बी’ जीवनसत्त्व खास करून पचनसंस्थे संदर्भात कार्यरत असते. अन्न पचवणे आणि त्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी याची गरज असते. मेंदूसाठी हे फार महत्त्वाचे असते. भाज्या, बिया, मासे आदी मधून ‘बी’ जीवनसत्त्व मिळते. याच्याही गोळ्या मिळतात.

‘सी’ जीवनसत्त्व

हाडांना मजबुती देण्याचे, त्वचेची काळजी घेण्याचे, रक्त स्त्राव सुरळीत चालवण्याचे काम ‘सी’ जीवनसत्त्वाचे असते. पपई, किवी, केळं आदी पदार्थांतून भरपूर ‘सी’ जीवनसत्त्व मिळते. याची ही गोळी मेडीकल ला मिळते.

व्हिटॅमिन्स च्या गोळ्या घ्याव्यात का

या गोळ्या घेणे फायद्याचेच आहे. शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी या गोळ्या चांगला उपाय आहेत. जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी झाले तर, अनेक आजार होतात. त्यामुळे काळजी घ्या. इतरही अनेक जीवनसत्त्व असतात. त्याच्याही गोळ्या मिळतात. या गोळ्या घ्याव्या का नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. या घेण्यात काही धोका नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago