आरोग्य

नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा

पपई: सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा.

कलिंगड: दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला भरपूर इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, लाइकोपीन आणि फ्रक्टोज मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. कलिंगड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. यामुळे कलिंगड सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या.

भिजवलेले बदाम: सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. व्यायाम किंवा जिम करणारे लोक जास्त करून भिजवलेले बदाम खातात. मात्र, सर्वांनीच सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेल्या बदामाचा समावेश करायला हवा. बदाम, अक्रोड आणि अंजीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. हे शरीराला ऊर्जावान ठेवण्याचे काम करते.

जिऱ्याचे पाणी: रिकाम्या पोटी जिरे पाणी आणि ओवा पाणी यांसारखा पाचक पेय घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात खनिजे, एंजाइम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. हे चयापचय सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

भाज्यांचे रस: तुम्ही गाजर, बीट आणि हिरव्या भाज्यांपासून बनवलेला रस सकाळी पिऊ शकता. विशेष म्हणजे हिरव्या भाज्यांचा ज्यूस सकाळी नाश्त्यामध्ये पिणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरने मोठ्या प्रमाणात आढळते. हे ज्यूस पचनसंस्था, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago