आरोग्य

अपचन/अजीर्ण/ढेकर कारणे लक्षण आणि त्यावरील उपाय

कारणे

कमजोर पचनशक्ती, जडान्न घेणे. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, तेलकट / तुपट पदार्थ वारंवार खाणे. व्यायाम न करणे, मांसाहार करणे.

लक्षणे

घश्याजवळ जळजळ होणे, अन्न अडकल्यासारखे वाटणे, पोट गच्च राहणे, गॅस होणे, जास्त तहान लागणे, वारंवार ढेकर येणे, भूक मंदावणे. इ.

उपाय

१) उपवास करा, कमी खा आणि हालका आहार घ्या.

२) पचन न होणारा पदार्थ टाळा.

३) वारंवार चहासारखे गरम किंवा कोमट पाणी प्या.

४) पपई/पेरू/आवळा रस घ्या. किंवा आवळा पदार्थ खा.

५) लिंबू रस १ चमचा + खाण्याचा सोडा एक चिमटी (थोडे) मिश्रण गरम करून थंड झाल्यावर लगेच घ्या.

६) लिंबू सरबत १ ग्लास + अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून घ्या.

७) सुंठपावडर एक चमचा + एक चमचा गुळ + थोडे तुप मिश्रण जेवणापूर्वी घ्या.

८) जेवणात कांद्यावर लिंबू पिळून खा.

९) जेवणापूर्वी थोडे आले + गुळ खा. चांगली भूक लागेल.

१०) 5/6 काळ्या मनुका खाणे. आम्लपित्त कमी होते. उत्तम उपाय आहे.

११) रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घ्या. किंवा दूध + तुप घेणे पोट साफ राहील.

१२) नियमित प्राणायाम, योगासने, व्यायाम करा. कायमस्वरूपीच आजार निघून जाईल.

१३) बडीशेप + जिरे + ओवा हे सर्व भाजके + खडीसाखर समप्रमाणात घेणे. थोडे बारीक करून बरणीत भरून ठेवणे. जेवणानंतर १/२ चमचा चावून खाणे. पोटाचे विकार लवकरच कमी होतात.

१४) शिजवलेले अन्न कमी करून कच्चे अन्न खाणे. (गाजर, बिट, काकडी, टोमॅटो, कोबी, कांदा, मटार शेंगा, कोथिंबीर इ.) फायबरयुक्त आहार घेणे. बेकरी प्रोडक्ट टाळा.

१५) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago