आरोग्य

अपचन-आंबट ढेकर, गॅसेसचा त्रास

सध्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्था मुळे पचनक्रिया तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर पचत नाही. पोटाचे विकार छळू नये, यासाठी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, खाता पिताना कोणती काळजी घायायला हवी, जेणेकरून पोटाचा त्रास होणार नाही. अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.

पाणी पिणे: जेवण करण्याच्या ३० मिनिट आधी नेहमी पाणी प्यावे. उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा स्थितीत पचनासह शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित चालतात. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय असे पदार्थ खावे, ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल.

आल: आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजार दूर होतात. आपण कच्चे आले चघळू शकता किंवा आल्याचा चहा, आले पाणी, आले कँडी खाऊ शकता.

दही: दही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे. दह्यात चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. दही जेवण करताना किंवा जेवणा नंतरही खाऊ शकता.

शतपावली: जेवल्या नंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते, पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्या नंतर शतपावली करा. निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि नंतर बद्धकोष्ठता किंवा गॅसेस सारखा त्रास होत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

15 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago