आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून विशेष सन्मान प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रगतीचे योग चांगले आहेत. धनलाभाचे योग आहेत तसेच रात्री व्यवसायात एखादी महत्त्वाची डील फायनल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहेत. समाजात दानधर्म आणि शुभकार्यावर खर्च करणार आहात. तुमचा मानसन्मान वाढेल.

वृषभ: आजचा दिवस उत्तम असून तुमचे लक्ष नवीन योजनांकडे असेल. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण असून सहकारी कामात मदत करतील. दुपारनंतर काही समस्या येतील पण हुशारीने त्यावर मार्ग सापडेल. कुटुंबात आनंददायक वातावरण असून तुमची मनोकामना पूर्ण होईल. एखाद्या देवस्थानाच्या यात्रेमुळे मनाला समाधान मिळेल. कायदेशीर वादात यश मिळण्याची शक्यता आहे. रिलोकशनवर फायनल निर्णय घेणार आहात.

मिथुन: आजचा दिवस सकारात्मक आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळेल. कलात्मक कामा केल्यामुळे मानसिक समाधानात वाढ आणि संपूर्ण दिवस आनंद असेल. तुमच्या आवडीचे काम करायला मिळाल्यामुळे कामात उत्साह असेल. नवीन कल्पना मनात आल्या तर तातडीने लिहून ठेवाय वरिष्ठांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

कर्क: आजचा दिवस उत्तम असून कलात्मक कामात यश मिळेल. तुम्ही जर मनापासून कठोर मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील, महत्त्वाच्या चर्चा घडतील. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण असेल आणि सहकाऱ्यांची उत्तम साथ असेल. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहे.

सिंह: तुमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून तुम्ही धर्म आणि अध्यात्म याचे वाचन करणार आहात. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही सावध राहा. संध्याकाळी एखाद्या मंगलमय किंवा शुभकार्यात सहभागी होण्याचा योग आहे.

कन्या: आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही बोलताना आणि व्यवहारात संयम बाळगा. संवाद साधताना सावध राहा. आजूबाजूच्या लोकांसोबत वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा. संध्याकाळी वातावरण सकारात्मक असून समाधान मिळेल.

तूळ: आजचा दिवस लाभदायक आहे. कामकाजाशी संबंधित सर्व वादविवाद मिटू शकतात. नवीन प्रोजेक्टवरही काम सुरू होण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंदर्भात कुटुंबीय किंवा आसपासचे लोक काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही सावध राहा आणि कामात जास्तीत जास्त फोकस ठेवा.

वृश्चिक: आजचा दिवशी परिस्थिती मजबूत असेल. दिवसभर शुभलाभाचे योग आहेत. तुम्ही सतत कार्य करत राहणार आहात. कुटुंबात सुख, शांती आणि समाधान असल्यामुळे तुम्ही अधिक आनंदी असाल. नोकरी किंवा व्यवसायात काहीतरी नवीन गोष्टी करणार आहात यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. तुमच्या कामात नवचैतन्य आणि उत्साह असेल

धनु: जे काही काम कराल त्यात सर्तक राहणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात थोडी जोखीम घेतल्यास मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. दिवसभरातील नियोजीत कामांसोबत नवीन काम करणार आहात. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी आर्थिक मदत उभी करावी लागू शकते. नवीन संधी तुमच्या आसपास आहे, तिला ओळखणे तुमच्या हातात आहे. संधीचा लाभ घेणे उत्तम आहे.

मकर: आजचा दिवस सामान्य आहे. भागीदारीत किंवा संयुक्तपणे केलेला व्यवसाय चांगला फायदा देणार आहे. दैनंदिन घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी आज उत्तम संधी आहे. मुलांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. प्रामाणिकपणा आणि ठरवलेल्या नियमांचे पालन करुन काम करा म्हणजे उत्तम यश मिळेल. अनेक प्रकारची कामे एकाच वेळी हातात घेतली तर अस्वस्थता वाढू शकते.

कुंभ: आजचा दिवस ठिक आहे पण आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला किंवा ताप येण्याची शक्यता आहे. आहाराबाबत निष्काळजीपणा करू नका. व्यापाराच्या दृष्टीने दिवस सुखद आहे पण जर तुम्ही घाईगडबड केली तर चुका होऊ शकतात, म्हणून प्रत्येक काम विचारपूर्वक करा.

मीन: आजचा दिवस लाभदायक आहे. व्यापारात घेतलेला जोखीम तुम्हाला फायदा देईल. अडचणी किंवा समस्या संयम आणि सौम्य भाषा वापरून सोडवा. बुद्धिचातुर्याचा वापर केला तर आत्तापर्यंत ज्याची कमतरता जाणवत होती ती गोष्ट मिळू शकते. एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत करणे तुमच्यासाठी सकारात्मक असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

11 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

15 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

20 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

27 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago