आरोग्य

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे

आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते.

सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात.

लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात.

ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.

शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते.

लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते.

ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे ,पोटात वायू होणे ,ढेकर येणे अशी लक्षणे असतात त्यांच्यासाठी लिंबाचा रस हा अतिशय उत्तम आहे.

लिबाच्या रसामुळे पचनास मदत होते. कारण लिंबाच्या रसामुळे शरीराच्या पतनसंस्थेतील विषद्रव्ये ही बाहेर पडली जातात व पचन हे सुलभ होते.

वजन कमी होण्यासाठी लिंबू पाणी कसे कारणीभूत आहेत ते जाणून घेऊयात.

लिंबा मध्ये आणि इतर फळांमध्ये पेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असतो त्यामुळे पोट भरल्याची भावना जाणवते.

एक पेलाभर लिंबू पाणी प्यायल्यास जेवण कमी जाईल व त्यामुळे काही प्रमाणात उष्मांक कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

लिंबू हे आम्ल प्रकृतीचे असते त्यामुळे लिंबाचं नुसता रस न खाता तो पाण्यातून घेणे अधिक हितावह.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago