भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते. पोळी भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच याचे काही तोटेही आहेत.
ब्लड शुगर राहील स्थिर
गहू हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते. जे विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहे. ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी मदत होईल.
पचन सुधारते
गव्हात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांसंबंधीत समस्या किंवा पचनक्रिया मंद होऊ शकते. ज्यामुळे गॅस, पोटदुखी, उलट्या, आणि पोटाचे विकार वाढू शकतात. अशा परिस्थितीत गहू न खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो.
वजन कमी करण्यास मदत
व्हाईट ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या प्रोसेस्ड कार्ब्सचा वजनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रिफाईंड गव्हापासून तयार पदार्थ वेट गेन करतात. याशिवाय हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूकही लागते. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर, हे पदार्थ खाणं बंद करा. ज्यामुळे कॅलरीज इनटेक कमी होईल आणि वेट लॉस होईल.
गव्हाला पर्याय काय
आपण क्विनोआ, ओट्स, ब्राऊन तांदूळ किंवा ज्वारी बाजरीचे पदार्थ खाऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…