मुख्य बातम्या

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात पिंपळसुटी येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन रक्षा अजय निकम (वय ४ वर्षे, रा. पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. (दि २४) रोजी सायंकाळी ७ ते ७:३० दरम्यान हि दुर्दैवी घटना घडली असुन चिमुकलीला तिच्या आई समोरच बिबटयाने या चिमुरडीला फरफटत नेले आणि दोन तासानंतर या चिमुरडीचा लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे.

 

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात आत्तापर्यंत तिसऱ्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मुलीचा मृतदेह पाहतात मुलीचे आई-वडील व नातेवाईकांनी टाहो फोडल्याने परिसरातील महिला नागरिक गहिवरले होते. या बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरडीचे धड व डोके वेगळे झाले असल्याने पुन्हा एकदा मांडवगण फराटा येथे १५ नोव्हेंबर रोजीचा शिवतेज टेंभेकर या पाच वर्षे मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या घटनेची आठवण झाली आहे.

आई समोरच चिमुकलीला बिबटयाने उचलले…

पिंपळसुटी येथे नदीच्या कडेला दशक्रिया घाटाजवळ राहणाऱ्या निकम यांची चार वर्षाची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळेस लाईट गेल्याने तिची आई दुसऱ्या मुलाला जेऊ घालत असताना अचानक आई समोरच बिबट्याने हल्ला करत चिमुरडीला शेतामध्ये फरफटत नेले. आईने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या तिला ओढत लांब घेऊन गेला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जमा झाले. त्यानंतर मुलीचा शोध घेत असताना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन येऊन मुलीचा शोध सुरु केला. जवळपास दोन ते अडीच तासाने चिमुरडीचा मृतदेह आढळला आहे. वन खात्याच्या वतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

 

शिरुरच्या पुर्व भागातील तिसरी दुर्दैवी घटना…

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात या अगोदर मांडवगण फराटा येथे दोन लहान मुलांना नातेवाईकांसमोर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे. त्यानंतर पुर्व भागातील हि तिसरी दुर्दैवी घटना आहे. त्यात या चार वर्षीय लहान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अगोदर मांडवगण-वडगाव रासाई परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वीस पिंजरे लावले होते. त्यात मांडवगण फराटा-वडगाव रासाई परिसरात दोन तर रांजणगाव सांडस परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.

 

भय इथले संपत नाही…

मांडवगण फराटा परिसरात रोज बिबट्याचा वावर असुन गेल्या आठ दिवसापुर्वी एका व्यक्तीच्या पाठीमागे बिबट्या लागला होता. तर दोन पशुधनाचा बळीही त्याने घेतला होता. तसेच मांडवगण फराटा येथे दोन मुलांचा जीव घेणाऱ्या नरभक्ष बिबट्यानेच तर हा हल्ला केला तर नाही ना अशी शंका वन विभागाला आहे. तसेच आसपासचे नागरीकही या घटनेमुळे भयभीत झालेले आहेत.

 

वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी… 

शिरुर तालुक्यातील पुर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असुन, मांडवगण फराटा नंतर पिंपळसुटी या गावात नरभक्षक बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात रक्षा निकम या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिक व शाळकरी मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

17 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

17 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

17 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago