आरोग्य

फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा

आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर एक्सपायरी डेट बरोबर असेल तर उत्पादन देखील ठीक असते, सुरक्षित असते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की वस्तूची तारीख बरोबर असते, परंतु त्याची गुणवत्ता खराब निघण्याची शक्यता असते. यामुळे केवळ पैशाचे नुकसान होत नाही तर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही केवळ तारीखच नाही तर इतर काही महत्त्वाच्या गोष्टी देखील काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे असते.

एक्सपायरी डेट व्यतिरिक्त या गोष्टी देखील नक्की पाहा

1) इंग्रीडिएंट्स लिस्ट

जेव्हा तुम्ही कोणतेही पॅकेज्ड अन्न खरेदी करता तेव्हा प्रथम त्याच्या घटकांची यादी तपासा, ही यादी बहुतेकदा पॅकेज्डच्या मागे किंवा त्याच्या एका साईडला छापलेली असते. त्यामध्ये त्या अन्नात काय काय इंग्रीडिएंट्स असतात ते सांगितले जाते. जर तुम्हाला यादीत ही नावे दिसली – -रिफाइंड शुगर, हाइड्रोजेनेटेड ऑयल, मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG), प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा आर्टिफिशियल फ्लेवर, तर अशा उत्पादनांपासून दूर रहा, या गोष्टी जास्त काळ खाल्ल्याने शरीराला, विशेषतः मुले आणि वृद्धांना हानी पोहोचू शकते. नेहमी अशी उत्पादने खरेदी करा ज्यात नैसर्गिक घटक असतील, जसं की होल ग्रेन, देशी तूप, मध किंवा तुम्ही ऐकलेला कोणताही मसाला.

2) न्यूट्रिशन लेबल वाचायला विसरू नका

बऱ्याचदा आपण या भागाकडे दुर्लक्ष करतो, पण हाच कॉलम सर्वात महत्वाची माहिती देतो. पॅकेटवर न्यूट्रिशन फैक्ट्सचा एक छोटासा बॉक्स निश्चितपणे दिलेला असतो. त्यावरून उत्पादनात किती कॅलरीज, फॅट, शुगर, फायबर, प्रोटीन आणि कार्ब्स आहेत हे समजते. जर तुम्हाला निरोगी अन्न खायचे असेल, तर असे उत्पादन निवडा ज्यामध्ये कमी शुगर, कमी ट्रान्स फॅट आणि जास्त फायबर आणि प्रोटीन असतील. न्यूट्रिशन लेबल तुम्हाला कोणते उत्पादन चांगले आहे हे ठरवण्यास मदत करते. जर तुम्ही दोन प्रोडक्ट्समध्ये गोंधळलेले असाल, तर या बॉक्सच्या मदतीने त्यांची तुलना करणे सोपे जाते तसेच आरोग्यासाठी चांगले असलेले प्रोडक्टस् खरेदी करू शकता.

3) FSSAI क्रमांक आणि मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स

प्रत्येक पॅकेज्डवर FSSAI क्रमांक लिहिलेला असतो, ज्यावरून हे समजते की प्रोडक्टला सरकारने मान्यता दिली आहे की नाही. जर एखाद्या प्रोडक्टच्या पॅकेजवर हा क्रमांक नसेल, तर ते खरेदी करणे धोकादायक असू शकते. तसेच, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स वाचा, म्हणजे ते कोणत्या कंपनीने बनवले आहे, ते कुठे बनवले आहे आणि केव्हा बनवले आहे. यामुळे तुम्हाला कळेल की उत्पादन किती नवीन आहे आणि कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवता येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago