आरोग्य

अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या समस्या

आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, व्हिटामिन कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्ता मध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे, तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह.

पुढील काही विनाखर्चाचे घरगुती उपचार आहेत, जे रोजच्या आहारातील आहेत, जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास, अनेक रोगांपासुन स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो.

दररोज किमान ३ खजुर खाणे.

महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे.

आठवड्यातुन किमान एका वेळेस जेवणानंतर पान खावे.

दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे.

सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे, त्यानंतर १ तासाने कोमट पाणी घ्यावे.

टॅामेटो गाजर बीट इत्यादी सॅलड दररोज दुपारी किमान एका वेळेस तरी घ्यावे.

शिर्षासन ५ मिनिट व पायांच्या टाचेवर ५ मिनिट उभे राहावे.

महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे व वमन करावे.

महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, सलाड व पाणी चालेल.

महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळी मिरी ची पावडर व काळे मीठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे.

पहाटे लवकर उठून १० मिनिट प्राणायाम करावा.

ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्या सोबत घ्यावे.

स्त्रियांनी मासिक पाळी नंतर व त्या आधीच्या त्रासासाठी, दररोज दुपारी जेवणा नंतर अर्धा ग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी तर होतेच, शिवाय शरिरातील विषतत्वे नाहिशी होतात.

दररोज कमीत कमी २० मिनिट चालावे.

कडधान्ये, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच, शिवाय अशक्तपणा हि जातो.

आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०-२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. असे दररोज केल्यास उत्तमच.

कोणत्याही आहारा मध्ये थोडीशी सुंठ वापरावी.

वरील पैकी कोणतेही उपाय जे सहज शक्य असतील ते करून स्वतःला व परिवाराला निरोगी करूया.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

5 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

5 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

7 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

9 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

9 तास ago