आरोग्य

भाज्या न खाल्ल्यास काय होत बघाच…

माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी हा वाद न संपणारा आहे. जेव्हा माणूस गुहांमधून राहत होता, शिकार करून आणि कंदमुळं खाऊन आपली उपजीविका करत होता, त्यावेळी तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करत होता. पण त्यानंतर भटक्या जीवनशैलीचा त्याग करून तो शेती करू लागला, एका जागी स्थिरावला, तसा त्याच्या आहारात आपल्या शेतात पिकणाऱ्या अन्नाचा जास्त समावेश होऊ लागला. त्यामुळे अर्थातच शाकाहाराकडे त्याचा कल जास्त झाला. याचा प्रभाव त्याच्या शरीरक्रियांवरही पडला आणि त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी त्याला जे अनेक प्रकारचं पोषण लागतं त्यासाठी ताज्या भाज्या आणि फळफळावळ यांचा समावेश त्याच्या आहारात असणं आवश्यक बनलं आहे. परंतु भाज्या किंवा फळं यातून त्याला कोणतं पोषण मिळतं यापेक्षाही त्यांच्यापायी त्याच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या कोणत्या घटकांना प्रतिबंध होतो, हे पाहणे उपयुक्त ठरेल.

ताज्या भाज्या आणि फळं यातून मिळणारी खनिजं, जीवनसत्त्व, अनेक वनस्पतीजन्य रासायनिक संयुगं आणि तंतुमय पदार्थ यांच्यामुळं निकोप वाढ तर होतेच, पण दीर्घकाळ छळत राहणाऱ्या, शरीरक्रिया मधील संतुलन ढळल्यामुळे उमटणाऱ्या व्याधी पासून त्याचा बचाव होतो. केवळ आहारातून ही जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळत असल्यामुळे आहाराव्यतिरिक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. आपलं वजन प्रमाणात राखण्यासाठीही भाज्यांचा उपयोग होतो, कारण अधिक उष्मांक पोटात न जाताही पोट भरणं शक्य होत.

भाज्या न खाल्ल्यास हृदयविकार जडण्याची शक्यता वाढीस लागते हे सर्वेक्षणातून सिद्ध झालेल आहे. भाज्यांमधून व खास करून फळांच्या सालांमधून मिळणारी अँटीऑक्सिडंट तत्त्वं या विकारांपासून संरक्षण देतात. रक्तदाब आटोक्यात ठेवायचा असेल तर पालक, मेथी यांच्या सारख्या हिरव्या पालेभाज्या, लाल माठ, ब्रोकोली या सारख्या फुलभाज्या, संत्री, मोसंबी किंवा ग्रेपफ्रूट यासारखी सायट्रस जातीची फळं आहारात असणं आवश्यक आहे. तंतुमय पदार्थांच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्थेलाही मदत मिळून कोठा साफ राहतो, कारण हे पदार्थ आतडय़ांमधून जात असताना पाणी शोषून घेऊन फुगतात व त्यामुळे आतड्यांचं चलनवलन सुलभ होतं. बद्धकोष्ठाच्या व त्यापायी उद्भवणाऱ्या मूळव्याधी सारख्या इतर विकारांपासून बचाव करतात.

तोंड, घसा, अन्ननलिका किंवा जठर यांच्या कर्करोगा पासून बचाव करण्यासाठी पिष्टमय पदार्थ ज्याच्यात कमी आहेत अशा लाल किंवा हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली सारख्या फुलभाज्या, लसूण आणि कांदे नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरुषांना उतारवयात होणाऱ्या पुरुषग्रंथीच्या कर्करोगा पासून टोमॅटो बचाव करू शकतो. त्यातला लायकोपेन हा पदार्थ त्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago