आरोग्य

शेवगा हे निसर्गाचं अमूल्य देण

आपण नेहमी आरोग्यासाठी महागड्या सप्लिमेंट्स, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटीन शेक्स शोधतो. पण निसर्गानेच आपल्याला एक अशी चमत्कारीक भाजी दिली आहे, जी शरीरासाठी सुपरफूडच ठरते, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा, म्हणजेच मोरिंगा.

शेवगा – एक मल्टीव्हिटॅमिन: शेवग्यात आहे दुधापेक्षा ४ पट अधिक कॅल्शियम, म्हणजेच हाडांसाठी अजोड. केळ्यांपेक्षा ३ पट जास्त पोटॅशियम, म्हणजे हृदय आणि स्नायूंच्या कार्यासाठी उत्तम. आणि मांसाहार पेक्षा २ पट अधिक प्रथिने, म्हणजे शरीराची ताकद वाढवणारा नैसर्गिक स्त्रोत.

ताकद नि रोगप्रतिकारक शक्ती वाढते: शेवग्यात अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, फॉस्फरस, आणि अ, क व ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो आणि त्वचा चमकदार राहते.

सगळ्यांसाठी उपयुक्त: शेवग्याची पाने, शेंगा, फुले सगळेच उपयोगी आहेत. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनी शेवग्याचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः महिलांसाठी तर हे एक नैसर्गिक शक्तिवर्धक आहे.

निसर्गाचं अमूल्य देण: जर आपण दररोजच्या आहारात थोडा जरी शेवगा घेतला, तरीही त्याचे फायदे वर्षानुवर्षे टिकून राहतात. म्हणूनच म्हणतात, गोळ्यांमध्ये नाही, आरोग्य असतं ते आपल्या पारंपरिक भाज्यात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago