आरोग्य

रोज १० मिनिटे सूर्यप्रकाशात बसा

संतुलित जीवनशैली ही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आहार विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचे उत्तमरित्या नियोजन करता आले, तर आरोग्य नकळतच चांगले राहते. पण यामध्ये सुसूत्रता नसेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. शारीरिक आरोग्या सोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणेही अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी रुटीन मध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा.

सूर्यप्रकाश आपल्याला मोफत मिळत असलेली एक उत्तम देणगी आहे. पण आपण तिचा म्हणावा तसा उपयोग करुन घेत नाही. मात्र सूर्यप्रकाश शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून नियमितपणे सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सूर्यप्रकाशात शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन-डी असते. मानसिक आरोग्यासाठीही सूर्यप्रकाश अतिशय उपयुक्त असतो. शरीरात सेराटोनिन या हार्मोनची निर्मिती होण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर असतो. हा हार्मोन आनंदाशी निगडीत असल्याने त्याला हॅपी हार्मोन म्हटले जाते. म्हणूनच मूड चांगला राहावा आणि आपण कायम जास्तीत जास्त आनंदी राहावे यासाठी उन्हात बसण्याचा फायदा होतो.

कोणत्या गोष्टीमुळे नैराश्य आले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही हा हार्मोन अतिशय फायदेशीर ठरतो. म्हणून सकाळी सूर्य उगवण्याच्या २ तास आधी म्हणजेच जेव्हा खूप प्रखर सूर्यप्रकाश नसेल तेव्हा, साधारण २० मिनीटे अंगावर सूर्यप्रकाश आवर्जून घ्यायला हवा. अगदी ५ मिनीटा पासून सुरुवात केली तरी दिवसभर वाटणारा फ्रेशनेस, आनंद यातील बदल नक्कीच लक्षात येईल. यामुळे नकळतच मूड चांगला राहण्यास मदत होईल, झोपेची गुणवत्ताही सुधारेल. एकूण क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची पद्धत सगळेच सुधारण्यास ऊन्हात बसण्यामुळे मदत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago