आरोग्य

पित्तविषयी काही महत्वाची माहिती

मनाची अस्वस्थता त्यामुळे झोप नीट न होणे.

चहा-कॉफीसारख्या पेयांचे अतिसेवन आहारात ताक , आवळा, आमसुले या सारख्या पित्तशामकांचा अभाव.

काही ऍलोपॅथिक तीव्र औषधांनी पित्त होऊ शकते.

कदाचित सर्वात महत्वाचे – दिवसभरात पुरेसे साधे स्वच्छ पाणी जाणीवपूर्वक न पिणे. ही झाली पित्ताचा त्रास होण्याची महत्वाची कारण.

उलट्या किंवा अंगावर लाल चट्टे निर्माण होत अंगाला खाज सुटत असेल तर त्यासाठी आमसुलाचे सार पिणे व कोळलेल्या आमसुलांचा चोथा अंगाला चोळून १५ मिनिटांनी स्नान करणे . उलटी झाल्यास आले(१ छोटा तुकडा बारीक ठेचलेला) अर्धे लिंबू(रस), थोडेसे मीठ व अर्धा चहाचा चमचा मध यांचे एकत्र सेवन केल्यास उपयोग होतो.

पित्त होण्याची कारणे

जास्त तिखट आणि तेलकट खाणे,पुरेशी झोप न होणे,खाण्याच्या आणि झोपण्याचा वेळा बदलणे,बाहेरील खाद्यपदार्थ खाणे,इत्यादी पित्त होण्याची कारणे आहेत.

उपाय

जास्त तेलकट आणि तिखट खाणे टाळा.

जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्याच पालन करा.

बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्य तितके टाळा.

कोकम सरबत किंवा आमसूल चा आहारात वापर करत राहा.

अंगावर पित्त उठत असेल तर घरातील आमसूल पित्त उठत असलेल्या जागेवर चोळा,जास्त पित्त खवळले तर कोकम सरबत किंवा आमसूल चे पाणी करून प्या

कारण पित्त हे शरीरात तयार होणे गरजेचे च असते,फक्त त्याचे प्रमाण संतुलित राहिले पाहिजे.पित्त कमी तयार होत असेल किंवा जास्त प्रमाणात तयार होत असतील तर ते आरोग्याला चांगले नसते.

पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.

सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते.

खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो.

नेहमी पित्ताचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.

रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.

नियमित तुळशीचे सेवन पित्त मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.

जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.

तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.

मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.

पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.

आमसूल यालाच कोकम किंवा रतांबा असेही म्हणतात. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

45 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

22 तास ago