आरोग्य

डिंक म्हणजे संजीवनी! उष्माघात, त्वचेचे विकार, डिहायड्रेशनच्या समस्येवर फायदेशीर

डिंक म्हटलं तर उष्णतेचा पदार्थ. हिवाळा सुरु झाला की, आपल्या आहारात डिंकाचे प्रमाण वाढते डिंकाच्या लाडूपासून ते त्याच्या अनेक पदार्थांची चव आपण चाखतो. उन्हाळ्यात डिंक खाणे म्हणजे शरीरातील उष्णता वाढवून घेणे. परंतु, डिंकामध्ये देखील अनेक प्रकार आढळतात. ज्यातला एक गोंद कटिरा. सध्या सोशल मीडियावर याचा अधिक प्रमाणात ट्रेंड सुरु आहे.

उन्हाळा सुरु झाला की, डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी आपण काकडी, ज्यूस आणि इतर पेयांचा आपल्या आहारात समावेश करतो. परंतु, उष्माघात, त्वचेच्या समस्येवर आणि डिहायड्रेशनवर डिंक फायदेशीर ठरु शकते.शरीरातील पाण्याची कमरता भरुन काढण्यासाठी आपण हे डिंक खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात आपले पोट थंड आणि निरोगी ठेवण्यासाठी अधिक मदत करते. याला चव नसली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते

1) उष्मघातापासून संरक्षण 

डिंक हा नैसर्गिक आणि चिकट पदार्थ आहे. याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने ते जेलीसारखे तयार होते. आपण उन्हाळ्यात याचे सरबत किंवा दुधात मिसळून प्यायल्याने उष्माघातापासून आपले संरक्षण होईल.

2) पोटाला थंडावा मिळेल

डिंकामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमीन बी आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने आपल्या पोटाला थंड ठेवण्यास खूप मदत होते. सकाळी लवकर हे पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जात्मक राहाता येते.

3) पोटाची चरबी कमी होते 

उन्हाळ्यात आपल्याला सतत पाण्याची तहान लागते. अशावेळी आपल्या पोटात अन्न देखील जात नाही. अनेकदा वाढत्या वजनामुळे आणि पोटाच्या चरबीमुळे जीव नकोसा होतो. या काळात डिंक नियमितपणे खाल्ल्याने चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. यात असणारे फायबर आणि पोषकतत्वामुळे पोट दिवसभर भरते. ज्यामुळे भूक कमी लागून चयापचय राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.

4) डिहायड्रेशनची समस्या 

डिंक पाण्यात भिजवून दररोज ते पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहाते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. हे नियमितपणे खाल्ल्याने अपचन, अतिसार आणि चिडचिड यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

10 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

14 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

14 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

15 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

15 तास ago