आरोग्य

तूपाच्या नियमित वापरासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती…

१) तूपाची बरणी कधीही फ्रीजमधे ठेवू नये. तूपाची फोडणी देऊ नये. कच्च्या तूपाचे सेवन करावे. कोणताही पदार्थ कधीच तूपात तळू नये.
२) तूपाचे सेवन नेहमीच गरम पदार्थासोबत करावे. (उदा. गरम दूध, गरम पाणी, गरम पोळी-चपाती, गरम वरण-भात इत्यादी.)
३) प्रत्येक वेळेस जेवढे पाहिजे असेल तेवढेच तूप बरणीतून काढून घेऊन बंद बरणी पुन्हा नेहमीच्या सुरक्षित ठीकाणी ठेवावी.
४) तूपामधे पाणी, तेल किंवा इतर पदार्थ मिसळणार नाही याची काळजी घ्या, कारण तसे झाल्यास तूपामधे फंगस-बुरशी तयार होते आणि तूप खराब होऊन तुपाला उग्रस वास येतो.
५) तूप नेहमीच काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या किंवा चीनी मातीच्या स्वच्छ हवाबंद बरणीत ठेवावे. प्लास्टिकच्या बरणीत कधीच ठेवू नये.
६) रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा देशी गाईचे शुद्ध तूप खाऊन/पिऊन त्यावर गरम पाणी किंवा गरम दूध प्यावे, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
७) पोळी, पुरणपोळी, उकडीचे मोदक इत्यादी गरम पदार्थ देशी गाईच्या शुद्ध तूपासोबत खाल्यास पदार्थ सुगंधीत, स्वादिष्ट आणि पौष्टिक होतात.
८) रात्री झोपण्यापूर्वी अर्धा पाऊण ग्लास देशी गाईचे दूध, थोडी हळद, चवीपुरती साखर आणि एक दीड चमचा देशी गाईचे शुद्ध तूप फेटून एकजीव करून उभं राहून प्याल्याने सांधेदुखी बरी होते.
९) रात्री झोपण्यापूर्वी चार पाच थेंब तूप चेह-याला लावून मसाज केल्याने चेह-याची चमक (Glow) वाढते. देशी गाईच्या शुद्ध तुपाच्या नियमित सेवनामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो किंवा कॅन्सर न होण्याची शक्यता वाढते.
१०) झोपण्यापूर्वी एक दोन थेंब तूप डोळ्याखालील काळ्या त्वचेवर लावल्याने काही दिवसात DARK CIRCLES निघून जातात.
११) देशी गाईच्या शुद्ध तूपाच्या नियमित सेवनामुळे हृदयाकडे जाणा-या रक्तवाहीन्या लवचिक होतात ज्यामुळे Blockages होत नाहीत.
१२) देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-या जाळून त्या जळत असताना त्यावर देशी गाईचे शुद्ध तूप टाकल्याने वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
१३) देशी गाईच्या शुद्ध तूपाच्या नित्य सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा आजार पूर्णपणे बरा होतो. देशी गाईच्या शुद्ध तुपाच्या नियमित सेवन केल्यास अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास संपुष्टात येतो.
१४) देशी गाईचे शुद्ध तूप रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दोन्ही नाकपुडीत 2-3 थेंब टाकल्यास काहीच दिवसात घोरणे बंद होते आणि खांद्याच्या वरील सर्व अवयव निरोगी राहतात.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

15 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

16 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago