१) पपईचे रोज खा. ही आँल सिझन मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
२) रोज दही खालल्यास चरबी कमी होण्यास मदत होते. दही खा. व दिवसातून २-३ वेळेस कमित कमी १ लिटर ताक प्यावे. वात रक्त, गाऊट, संधीवात, आमवात वाल्यांनी या वाट्याला जाऊच नये.
३) पिंपळाच्या सालीचे चूर्ण, धने, जीरे, सैधव, दररोज दिड चमचा ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
४) वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही ,टोन्ड पनीर मल ई नसलेले रोज खा.
५) आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करुन चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
६) दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्या.
७) जेवणात वरुन मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करु नये.
८) वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ (डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
९) दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करु नयेत.
१०) सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करुन घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…