आरोग्य

केस नॅचरली काळे करण्याचा सगळ्यात सोपा उपाय मेहंदी, डाय लावण्याची कटकटच नाही

हल्ली कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले आहेत. कॉलेजमधल्या कित्येक विद्यार्थ्यांचेही केस हल्ली पांढरे झालेले असतात आणि ते लपविण्यासाठी त्यांना डाय, मेहेंदी, हेअरकलर अशा गोष्टींचा वापर करावा लागतो.

एवढ्या कमी वयापासूनच केसांवर केमिकलयुक्त डाय किंवा हेअरकलर लावणे अनेकांना पटत नाही. कारण त्याचे खूप साईडइफेक्ट त्वचेवर, केसांवर, आरोग्यावर होत असतात असं आपण नेहमीच ऐकतो.

म्हणूनच आता मेहेंदी, डाय असं काहीही न लावता केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे करायचे असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी त्रिफळा चूर्ण एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये घ्या.

त्या चुर्णामध्ये लिंबाचा रस घाला. त्रिफळा चूर्ण व्यवस्थित भिजून त्याची चांगली पेस्ट तयार होईल एवढा लिंबाचा रस त्यात घालावा.

आता ही कढई रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या त्रिफळा चूर्णला काळसर रंग आलेला असेल. आता ही पेस्ट हातामध्ये ग्लोव्ह्ज घालून किंवा ब्रश वापरून तुमच्या केसांना लावा.

ही पेस्ट तुमच्या केसांवर साधारण १ तास राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांना छान काळसर रंग आलेला असेल आणि हा रंग तुमच्या केसांवर महिनाभर तरी टिकून राहील असं डॉक्टर सांगत आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago