Dhangari-blanket
गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो.
साधारणपणे एक घोंगडी विणायला २ ते ३ दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी घोंगडी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्याला पडत असतील तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी ही एक महत्वाची आहे.
धनगरी घोंगडीचे शरीरातही होणारे फायदे…
पाठदुखी, कंबरदु:खी, वात, सांधे दु:खी पासून आराम मिळतो. यामध्ये जीण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते. झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते. उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते. घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत. अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व आहे. तसा उल्लेखही पूर्वीच्या माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांच्या पेहरावामध्ये घोंगडीचा वापर होता. घोंगडीच्या वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते. मात्र सध्या जंगलक्षेत्र घटत चालल्याने मेंढी पालन व्यवसायावर गंडातर आले आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बाळू मामाच्या मेंढ्या वास्तव्यास असतात.
राजस्थानी मेंढपाळही आपल्या मेंढ्यांच्या कळपाला सोबत घेऊन या जंगलातून त्या जंगलात जातात. मेंढीची विष्ठा (लेंडी) ही शेतासाठी सेंद्रीय खत म्हणून चांगली असते. त्यामुळे अनेक शेतकरी मेंढ्याचा कळप आपल्या शेतात बसवतात. सरकारने मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मेंढपाळातून होत आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…