आरोग्य

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डाळिंब हे बहूगुणकारी आहे. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणका सारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तान कडील फळ आहे. डाळिंबात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात.

चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.

अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्याने दुर्गंधी निघून जाते.

शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्या.

श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.

मूळव्याधी मध्ये रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशर मध्ये घालून द्यावे, यामुळे रक्तपडण्याचे बंद होते, तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

ताप आला असेल तर डाळिंब खावे. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. ज्यांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) आहे त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबा पासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.

हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ, वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.

डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे, कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याच प्रमाणे स्वाद व चवही कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago