मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागाराकरिता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे ही दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व बजेटिंग, कार्य–जीवन संतुलन, कार्यस्थळी तंत्रज्ञान, अपग्रेडेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाचा समारोप `टीम बाँडिंग’साठी अनौपचारिक `कराओके’ सत्राने झाला.
प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवशी सर्जनशीलता व डिजिटल जागरूकतेवर भर देण्यात आला. संवेदी म्हात्रे व ओंकार पाटील यांनी समूह चित्रकला उपक्रम घेतला. तर मुकुंद नाडगौडा यांनी डिजिटल व सायबर सुरक्षेवर सुशासनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या वेळी संस्थात्मक सुधारणा विषयावर खुली चर्चा झाली. त्यात अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक कल्पक सूचना मांडल्या.
दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाला सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर व मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणाचे नियोजन महामंडळाच्या मुख्य वित्त अधिकारी चित्रलेखा खातू यांनी केले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…