काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते.
हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला ‘ग्राउंडिंग’ किंवा ‘अर्थिंग’ असेही म्हणतात.
अनवाणी चालल्याने पायातील स्नायू आणि सांधे जास्त कार्यशील होतात. त्यामुळे त्यांची ताकद आणि लवचिकता वाढते. चालण्यातही नैसर्गिक पद्धतीत सुधारणा होते आणि पायाचे विविध रोग टाळता येतात.
पायाच्या तळव्यांमधील संवेदनशील नसा जास्त कार्यशील होतात. त्यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते आणि पायांची स्थिती सुधारते.
गवतावर चालणे पाण्यातून चालणे अशा कृतींमुळे मानसिक आरोग्य छान राहण्यास मदत होते. गवतावर चालल्याने मनःशांती मिळते तसेच ताण कमी होतो. मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे विचारांमध्ये सुधारणा होते.
छान ताज्या गवतावर अनवाणी पायांनी फेऱ्या मारायच्या. असे केल्याने झोप फार छान लागते. गवतावर चालल्यावर शरीरातील सर्केडियन संतुलित होतो त्यामुळे झोप सुधारते.
अनवाणी चालल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे संतुलन सुधारते आणि पायांच्या नैसर्गिक हालचालींना चालना मिळते. पायांच्या हालचाली जास्त चांगल्या होतात.
गवतावर चालल्यावर पायाच्या बोटांवर दाब येतो. दाब आल्याने डोळ्यांचे मज्जातंतू सक्रिय होतात. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…