आरोग्य

पायी चालण्याचे फायदे

चालणे हे माणसांसाठी सर्वोत्कृष्ट औषध आहे. चांगली झोप आणि निरोगी आहारासह पायी चालणे आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांना टाळण्यासाठी मदत करू शकते. दररोज नियमितपणे १५-३० मिनिटे पायी चालणे एखाद्या माणसाच्या आरोग्यातच सुधार करीत नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवन शैलीत आपण जास्त पायी चालत नाही. परंतु आपल्याला पायी चालण्यासाठी दररोज काही वेळ काढायला पाहिजे. कारण ह्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहे, हे आपल्याला बऱ्याच आजाराशी लढण्यात मदत करतो. दररोज ३० मिनिटे पायी चालण्याचे फायदे जाणून घेऊया.

मेंदूत सकारात्मक बदल होतात: दररोज नियमितपणे पायी चालणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कमी प्रभाव वाले एरोबिक व्यायामामुळे जसे पायी चालणे सुरुवातीच्या डिमेन्शिया किंवा स्मृती भ्रंशाला होण्यापासून रोखते, अल्झायमर सारख्या रोगाचा धोका कमी करतं. एकंदरीत मानसिक आरोग्य सुधारतो.

हृदयरोगाचा धोका कमी करत: हृदय रोगाचा धोका कमी करण्या विषयी बोलावे, तर चालणे हे खूप प्रभावी ठरते. जेव्हा हृदय रोग किंवा स्ट्रोक पासून बचाव करण्याची वेळ येते, तेव्हा पायी चालणे हे धावण्यापेक्षा कमी प्रभावी नाही. ही क्रिया उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालच्या पातळीला कमी करून, रक्त परिसंचरण सुधारून हृदया संबंधी समस्या टाळण्यात मदत करतात.

फुफ्फुसांना प्रशिक्षण देत: पायी चालणे एक एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे रक्त प्रवाहात ऑक्सिजनच्या प्रवाहाला वाढवतं. हे शरीरातील विषाक्त घटक आणि कचरा दूर करण्यासह फुफ्फुसाला प्रशिक्षण देण्याच्या कामात मदत देखील करतं. पायी चालण्यामुळे चांगली आणि दीर्घ श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांच्या आजाराशी संबंधित लक्षणे कमी करता येतात.

स्वादुपिंडासाठी फायदेशीर: व्यायामा प्रमाणेच पायी चालणे, धावण्यापेक्षा मधुमेहाला रोखण्यासाठी अधिक प्रभावी ठरतं. पायी चालणाऱ्या लोकांच्या एका गटाने ६ महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीत असलेल्या धावणाऱ्याच्या गटाच्या तुलनेत ग्लूकोज सहिष्णुता मध्ये अंदाजे ६ पटीने सुधार करून दाखवले आहे.

पचन कार्य सुधारते: दररोज नियमितपणे ३० मिनिटे चालणे भविष्यात केवळ पोटाच्या कर्करोगाच्या धोक्याला कमी करत नाही, तर पचन आणि बद्धकोष्ठता देखील सुधारू शकते. ज्यामुळे शरीरास मल त्यागायला किंवा शरीरातील घाण नियमितपणे काढायला मदत मिळते.

सांधे आणि हाडे बळकट बनते: पायी चालणे सांध्यात अधिक गतिशीलता देते, हे हाडांच्या नुकसानाला रोखण्यास मदत करते. तसेच फ्रॅक्चरचा धोका देखील कमी करतं. नियमितपणे दिवसातून किमान ३० मिनिटे चालण्याने, सांध्यातील कडकपणा आणि सूज कमी करण्यात मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

49 मिनिटे ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago