आरोग्य

रात्रीच्या जेवणात हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नयेत

सकाळचा नाश्ता एखाद्या राजाप्रमाणे, दुपारचे जेवण सामान्य माणसाप्रमाणे तर रात्रीचे जेवण एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावे. असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच अर्थ सकाळचा नाश्ता खूप हेव्ही पोटभरीचा तर रात्रीचे जेवण हे अगदी कमी असावे. आपले आरोग्य आपल्या लाईफस्टाइलशी निगडीत असते. आहार-विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नाहीतर आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. आहाराचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आवर्जून टाळायला हव्यात असे सांगितले जाते.

रात्रीचा आहार हा हलका आणि सहज पचेल असा असावा. रात्री झोपताना जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. रात्री झोपल्यावर आपल्यी शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. अशावेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत.

रात्रीच्या वेळी जेवणांत कोणते पदार्थ खाणे टाळावे

१) गव्हापासून तयार केलेले पदार्थ: रात्रीच्या वेळी गव्हापासून तयार केलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. गहू आणि गव्हापासून तयार केलेले पदार्थ हे पचनास थोडे जड असतात त्यामुळे रात्रीच्या जेवणांत शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे. तसेच हे पदार्थ वेळीच पचले नाही तर आपल्याला अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे आजार यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात.

2) दही: दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी आवश्यक असते. पण दही पचायला काही प्रमाणात जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे शक्यतो टाळायला हवे. तसेच दही प्रकृतीने थंड असल्याने त्यामुळे सर्दी-कफ यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते.

3) मैदा: रात्रीच्या जेवणांत शक्यतो मैदा आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे. मैदा आणि मैद्यापासून तयार झालेले पदार्थ हे गव्हापेक्षा पचायला अधिकच जड असतात. यासाठी गव्हासोबातच मैदा देखील खाणे टाळावे.

4) गोड पदार्थ: काहीजणांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. साखर पचायला जड असल्याने ती शक्यतो सूर्यास्त होण्याच्या आत खायला हवीत असे सांगितलेले आहे. जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आपल्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. तसेच पचनक्रियेच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. यासाठीच जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे.

5) कच्चे सॅलॅड: रात्रीच्या जेवणासोबत कच्ची कोशिंबीर आणि सॅलॅड खाणे शक्यतो टाळावे. कच्चे सॅलॅड हे कोरडे आणि थंड असते. ज्यामुळे वात अनेक पटींनी वाढू शकतो. त्याऐवजी, आपण शिजवलेले किंवा ग्रील्ड केलेले तसेच वाफवलेल्या भाज्या खाव्यात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago