आरोग्य

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात ‘हे’ ५ संकेत

आपल्या शरीरात हजारो नसा असतात. नसांचं काम शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत रक्त आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचवणं असतं. अशात निरोगी राहण्यासाठी नसा चांगल्या आणि मोकळ्या राहणं गरजेचं असतं. जर नसांमध्ये काही समस्या झाली तर शरीरातील अनेक महत्वाचे अवयव प्रभावित होऊ शकतात. आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे नसांसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नसांमध्ये ब्लॉकेज ही त्यातील एक कॉमन समस्या आहे.

नसांमध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नाही. नसांमध्ये ब्लॉकेज होण्याची कारणं वेगवेगळी असतात, जसे की, चुकीचं खाणं-पिणं, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल, हाय कोलेस्टेरॉल आणि धुम्रपान इत्यादी. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीरात काही लक्षण दिसू लागतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली गेली तर गंभीर धोका टाळला जाऊ शकतो.

छातीत वेदना

नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर व्यक्तीच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेजमुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही. ज्यामुळे छातीत वेदना होतात. या वेदना हलक्या ते गंभीर असू शकतात. सामान्यपणे छातीच्या मधोमध वेदना होते. जर तुम्हाला असं लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

श्वास घेण्यास अडचण

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसं ऑक्सिजन पोहचत नाही. याच कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या शारिरिक हालचाली दरम्यान अधिक जाणवते. थोडी मेहनत केल्यावरही श्वास भरून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थकवा आणि कमजोरी

जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणं हा सुद्धा नसांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळेच व्यक्तीला पुन्हा पुन्हा थकवा आणि कमजोरी जाणवते. जर तुम्हालाही असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

चक्कर येणे

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असं लक्षण दिसू शकतं. नसा ब्लॉक झाल्यामुळे मेंदुपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सीजन पोहोचत नाही. ज्यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होतात. असं लक्षण दिसलं तर वेळीच सावध व्हा.

हात-पाय थंड पडणे

जर तुमचे हात-पाय नेहमीच थंड राहत असतील तर नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचं संकेत असू शकतो. ब्लॉकेज झाल्यावर रक्त पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. ज्यामुळे हात-पाय थंड जाणवू शकतात. त्याशिवाय अनेक लोकांना हात-पायांमध्ये वेदना किंवा सूज जाणवू शकते. जर तुम्हाला असं लक्षण दिसलं तर डॉक्टरांना दाखवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

48 सेकंद ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

40 मिनिटे ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

2 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

18 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

22 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

22 तास ago