आरोग्य

कान टोचण्यामागची ही आहेत मोठी कारणे

कान टोचणे ही फक्त फॅशन नाही, तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत.

भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही.यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर लावले जाते. तेव्हा यामधील सर्व रक्तवाहिन्या ॲक्टिव्ह होतात. आज अनेकांना वाटते की, फॅशनसाठी कान टोचले जातात. परंतु जेव्हा तुम्ही याचे फायदे वाचाल तव्हा आश्चर्यचकीत व्हाल.

मेंदूचा विकास होतो: कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणिउजव्या गोलार्ध्दला जोडला जातो. हे मेंदूच्या भागाला ॲक्टीव्ह बनवते. यामुळे जेव्हा मुलांचा मेंदू वाढत असेल तेव्हाच त्यांचे कान टोचावे.

डोळ्यांची शक्ती वाढते: कानाच्या खालील भागावर केंद्रीय बिंदु आहे. जेथून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या पास होतात. या बिंदूला दाबल्यानेडोळ्यांची शक्ती सुधारते.

कान राहतात निरोगी: जेथे कान टोचले जातात तेथे एक पॉइंट असतो. जो स्पष्ट ऐकण्यास मदत करतो.

लठ्ठपणा दूर करते: ज्या ठिकाणी कान टोचले जातात तेथे भूक लागण्याचा बिंदू असतो. ज्यावर छिद्र केल्याने पनचक्रिया दुरुस्त होते आणि लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी असते.

प्रजनन अंग निरोगी बनतात: इयर लोब्सच्या मध्यभागी अनेक असे प्रेशर पॉइंट आहेत. जे प्रजनन अंगाना निरोगी बनवण्यात फायदेशीर असतात.

तणावापासून सुटका: जेव्हा कान टोचले जाता तेव्हा क्रेंद्र बिंदूवर दबाव पडल्यामुळे अस्वस्थपणा आणि मानसिक आजार दूर करण्यातमदत मिळते.

एकाग्रता वाढवण्यात मदतक्ष मिळते: प्राचीन काळात गुरुकुल जाण्याअगोदर मुलांची मेधा शक्ती वाढवण्यासाठी आणि चांगले ज्ञान अर्जित करण्यासाठी त्यांचे कान टोचण्याची पध्दत होती. कारण कान टोचल्याने ब्रेन पावर वाढते आणि एकाग्रता वाढण्यात मदत मिळते. याच कारणामुळे भारतात बाळ जन्माला आल्याच्या आठ महिन्याच्या आत त्याचे कान टोचले जातात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago