कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायलाच हवेत. निरोगी जीवनशैली आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवू शकते, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. म्हणूनच आता आपण असे काही पदार्थ पाहूया जे पदार्थ कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतात. त्यामुळे ते पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे.
कॅन्सरचा धोका कमी करणारे पदार्थ कोणते?
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ नियमितपणे असायला हवे, असा काेणताच पदार्थ नाही, जो खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होणारच नाही, याची पुर्ण हमी मिळेल. पण काही पदार्थ निश्चितच असे आहेत की जे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. ॲण्टीऑक्सिडंट्स असणारे फळं, भाज्या, सुकामेवा आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायला हवा.
तसेच ब्रोकोली, पत्ताकोबी अशा व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असणाऱ्या भाज्या, टोमॅटो, गाजर अशा लाल भाज्या, कांदा, लसणू असे पांढरे पदार्थ, वांगं, ब्लूबेरी, मनुका असे निळे, जांभळे पदार्थ खावेत.
जेवढे रंगबेरंगी पदार्थ आपल्या आहारात असतील तेवढे आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. कॅन्सर होऊ नये म्हणून असं कोणतंही सुपरफूड नाही. पण सगळेच पौष्टिक पदार्थ थोडे थोडे आपण नियमितपणे खात गेलो तर त्याचा शरीरावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…