आरोग्य

पाणी प्यायल्यावर लगेच ‘ही’ लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत…

आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमची किडनी योग्य पद्धतीनं काम करत नसेल तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणं दिसतात. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये.

१) किडनीमध्ये वेदना

जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही, तेव्हा फिल्टर प्रक्रिया स्लो होते. यामुळे पाणी किडनीतून हळुवारपणे ब्लॅडरकडे म्हणजे ओटीपोटाकडे जातं. अशात जेव्हाही तुम्ही पाणी पिता तेव्हा किडनीमध्ये पाणी जास्त जमा होतं आणि यामुळे पाणी प्यायल्यानंतर किडनीमध्ये वेदना होतात.

२) मळमळ-उलटी

जेव्हाही काही किडनीसंबंधी काही समस्या होते, तेव्हा मळमळ-उलटी ही सगळ्यात सामान्य लक्षणं दिसतात. तसेच जर किडनीची समस्या जास्तच वाढली असेल तर पाणी प्यायल्यावर लगेच मळमळ आणि उलटी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे असं काही होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा.

३) चक्कर येणं

ज्या लोकांमध्ये किडनी खूप आधीपासून खराब असेल किंवा योग्यपणे काम करत नसेल अशा लोकांना नेहमीच चक्कर येते किंवा डोकं गरगरतं. खासकरून जास्त पाणी प्यायल्यावर किडनीवर दबाव वाढतो आणि यामुळे डोकं गरगरतं. तसेच डोकं दुखतं सुद्धा.

४) लगेच लघवी लागणं

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावं लागत असेल तर हा किडनी खराब होत असल्याचा किंवा झाल्याचा संकेत असू शकतो. मात्र, हिवाळ्यात किंवा एसीमध्ये जास्त राहिल्यानं सुद्धा पाणी प्यायल्यावर लगेच लघवी लागू शकते. तरी सुद्धा एकदा किडनीची टेस्ट केलेली बरी.

५) अचानक थकवा-कमजोरी

किडनी खराब झाल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर लगेच अचानक कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर हा किडनी गंभीरपणे खराब झाल्याचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago