आरोग्य

हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात.

सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब फुटत आहेत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर मोठी अडचण होऊ शकते.

डोकेदुखी आणि थंडीचा संबंध

थंड वातावरण आणि कमी उन्हामुळे बॅरोमेट्रिक प्रेशर बदलतं. ज्याकारणाने ब्लड प्रेशर बदलून डोकेदुखी, मायग्रेनचं कारण बनू शकतं. त्याशिवाय थंड हवा मेंदुच्या नसा आणि रक्त वाहिन्यांना संकुचित करतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढते.

दिवस लहान असणं हेही कारण

हिवाळ्यात दिवस लहान असल्यानेही डोकेदुखीची समस्या होते. मोठ्या रात्री आणि दिवस लहान असल्याने आपलं झोपण्या-उठण्याचं सर्कल बदलतं. ज्यामुळे डोकेदुखी वाढते.

थंडीच्या दिवसात हीटर-ब्लोअरसारखे इनडोर हीटींग टूल्समुळे बॉडी डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. ज्यामुळे मेंदू आकुंचन पावतो आणि अमेरिकन मायग्रेन फाउंडेशननुसार ही स्थिती डोकेदुखीचं कारण बनू शकते.

हिवाळ्यात घर गरम ठेवण्यासाठी रूम हीटर्स लावल्याने आणि खिडक्या-दरवाजे बंद असल्याने व्हेंटिलेशन योग्यपणे होत नसल्याने रूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड गॅस जमा होते. जो डोकेदुखीचं कारण बनतो.

सूप प्यायल्याने वाढते डोकेदुखी

थंडीच्या दिवसात स्वत:ला गरम ठेवण्यासाठी अनेकदा लोक बाजारातील सूप, नूडल्ससारखे पदार्थ खातात. ज्यात मोनोसोडियम ग्लूटामेट असतं. ज्यामुळे अनेकदा हिवाळ्यात डोकेदुखी होते. म्हणून हिवाळ्यात हे पदार्थ कमी खावेत.

कसा कराल बचाव

हिवाळ्यात जेव्हाही बाहेर जाल तेव्हा स्वत:ला गरम कपड्यांनी कव्हर करा. खासकरून डोकं.

भरपूर पाणी प्यावे.

व्हिटॅमिन डी असलेली फळं भरपूर खावीत.

पुरेशी झोप आणि हेल्दी डाएटवर फोकस करा.

नियमितपणे एक्सरसाइज करा.

जास्त कॅफीन जसे की, कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

4 मिनिटे ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

10 मिनिटे ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

14 मिनिटे ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

53 मिनिटे ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

6 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

13 तास ago