मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी

आरोग्य

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.

अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण त्यात भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे मेंदूच्या पेशींना पोषण देऊन, त्याचं वृध्दत्व कमी करतं. रोज सकाळी १ ते २ अक्रोड खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते, विचारशक्ती सुधारते आणि स्मरणशक्ती अधिक तीव्र होते. विशेषतः विद्यार्थी, मानसिक काम करणारे लोक किंवा ज्यांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण होते, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. हे दोन्ही घटक नैसर्गिक असल्यामुळे शरीरावर कोणताही साइड इफेक्ट न करता मेंदूला आवश्यक पोषण पुरवतात. झोपेत सुधारणा, तणाव कमी होणं, आणि मानसिक स्थैर्य यासाठीही खसखस व अक्रोड उपयुक्त आहेत. दीर्घकालीन उपयोगाने मन प्रसन्न राहतं, आणि मानसिक थकवा दूर होतो. त्यामुळे मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी हा सोपा आणि नैसर्गिक मार्ग नित्याने करण्या सारखा आहे.

(सोशल मीडियावरून साभार)