आरोग्य

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी

सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. या ज्यूस मध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ह्या ज्यूसचा फायदा व्हावा असं वाटत असेल, तर रोज एक ग्लास हा ज्यूस प्यावा. सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्यास अधिक परिणाम होऊ शकतो. थंडीत ABC ज्यूस पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

इम्यूनिटी वाढते: या ज्यूस मध्ये व्हिटॅमिन-सी असतं, जे सफरचंद आणि गाजरात आढळतं, ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेत शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून लढण्यास मदत करतं. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू पासून बचाव होतो.

तवाचेची चमक वाढते: हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते. अशा वेळी या ज्यूस मध्ये असलेले व्हिटॅमिन-ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची काळजी घेतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यात चेहरा तजेलदार दिसतो.

पचनक्रिया सुधारते: या ज्यूस मधील गाजर आणि बीट दोन्हीत भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा ज्यूस बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. या ज्यूसमुळे पोट हलकं राहून पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

एनर्जी लेव्हल वाढते: हिवाळ्यात, शरीराला अनेकदा थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. या ज्यूस मध्ये साखरेचा नैसर्गिक स्रोत असतो, ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. हा ज्यूस शरीर दिवसभर एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा ज्यूस फायदेशीर ठरतो. गाजर आणि बीट सारख्या घटकात कॅलरीज कमी असतात, पण भरपूर फायबर असतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या ज्यूस मुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

3 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

3 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

3 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

3 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

4 तास ago

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…

5 तास ago