आरोग्य

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग

कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात, त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते.

युरीन इन्फेक्शनची लक्षणे

१) लघवी करताना जळजळ होणे.

२) लघवी करताना वेदना होणे.

३) वारंवार लघवी येणे.

४) लघवीचा गडद रंग असणे.

५) लघवीला अधिक दुर्गंध येणे.

६) गुप्तांगात खाज येणे.

७) ओटीपोटातून कळ येणे.

8) लघवी करताना रक्त येणे.

९) थंडी ताप येणे.

१०) थकवा, अशक्तपणा जाणवणे.

११) लघवी थांबून थांबून होणे.

१२) पाणी कमी पिणे.

१३) गरोदरपणात इन्फेक्शन होणे.

१४) अस्वच्छ राहणी.

१५) मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते.

1६) मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने.

१७) भूक न लागणे.

१८) आळसपणा जाणवणे.

19) वारंवार लघवी होण्याची भीती होणे.

20) कंबर दुखणे.

21) हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते, असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्या

बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात, असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.

नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.

पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते, त्या मुळेपण संसर्ग होते.

अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.

कपडे जास्त घट्ट नसावे.

युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.

व्हिटॅमिन-सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.

पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.

अननसाच्या रसाचे सेवन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago