शिरूर तालुका

शिरूर! अभिनव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात उल्लेखनीय भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित “शिरूर तालुका शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५/२६” अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी गटामध्ये शिरूर तालुक्यातील अभिनव विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण निकाल आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर विद्यालयाने तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

अभियानाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्यालयाचे सखोल परीक्षण करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक NMMS शिष्यवृत्तीतील यशाची परंपरा, ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षांमधील उल्लेखनीय यश, एस.एस.सी. परीक्षेतील सातत्यपूर्ण निकाल, सरकारी ग्रेड चित्रकला परीक्षेतील प्राविण्य, नाट्यवाचन, नाट्छटा स्पर्धेतील यश, ‘सुंदर हस्ताक्षर’, सामान्यज्ञान स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांतील सहभाग, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, पर्यावरणपूरक उपक्रम, प्लास्टिक संकलन, सुका-ओला कचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत प्रकल्प,‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान, आकर्षक परसबाग, डिजिटल अध्यापन वर्ग, अध्यापनात AI तंत्रज्ञानाचा वापर, संगणक लॅब, सुसज्ज प्रयोग शाळा, स्टेम टिंकरिंग लॅब,उत्कृष्ट लेझीम व झांज पथक अशा विविध अंगांनी विद्यालयाचे मूल्यमापन करण्यात आले.

विद्यालयाने सर्वच निकषांमध्ये दर्जेदार कामगिरी करत परीक्षकांची मने जिंकली. स्वच्छ, हिरवळयुक्त परिसर, समृद्ध शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांची तळमळ यामुळे विद्यालयाची गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा शिरूर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत (काका) पलांडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, अभिनव विद्यालयाने गुणवत्ता संवर्धन अभियानात मिळवलेले यश हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची व उल्लेखनीय बाब आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समन्वय साधत विद्यालयाने आदर्श उभा केला आहे. मुख्याध्यापक श्री. शांताराम खामकर सर, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध राहील आणि अशा गुणवंत कार्याला आमचा सदैव पाठिंबा राहील.” तसेच संस्थेचे पदाधिकारी, सर्व संचालक व व्यवस्थापन समिती सदस्यांनीही विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिनव विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अधिक उच्च स्थान मिळविण्याचा निर्धार विद्यालय परिवाराने व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

हिवरे कुंभार जि.प. शाळेचे माजी विद्यार्थी ३२ वर्षांनी शिवनेरीवर; गुरुजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची १८००२२१२५१ हि’ हेल्पलाईन सुरू

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेतील माजी विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा एकत्र…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago