आरोग्य

ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

प्री-डायबिटीज एक अशी स्थिती आहे ज्यात ब्लड शुगर लेव्हल सामान्यापेक्षा अधिक असते. पण इतकीही जास्त नसते की, याला टाइप 2 डायबिटीस म्हटलं जाईल. पण यामुळे डायबिटीसचा धोका नक्कीच राहतो. यात एक चांगली बाब ही आहे की, हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून प्री-डायबिटीजना ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल करता येऊ शकते.

ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय

कारल्याचा ज्यूस

कारल्याचा ज्यूस डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान मानला जातो. याची टेस्ट कडवट नक्कीच आहे, पण यात चरेन्टिन आणि मोमोर्डिसिन नावाचे तत्व असतात, जे शरीरात इन्सुलिनचं काम करतात. हे तत्व तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास आणि तुमची इन्सुलिन सेन्सिटिविटी सुधारण्यास मदत करतात. न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, कारल्याचा ज्यूस तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी 30 दिवस प्यावा. यानं डायबिटीसमध्ये सुधारणा होईल.

स्ट्रिंग बीन्सचा चहा 

स्ट्रिंग बीन्स म्हणजेच फरसबीच्या शेंगा शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. या शेंगाचा चहा खूप प्रभावी ठरतो. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि आवश्यक व्हिटामिन असतात. जे पॅंक्रियाटिक हेल्थचा सपोर्ट करतात. या चहानं ग्लूकोज स्पाइक कमी करण्यास आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. या शेंगाचा चहा तयार करण्यासाठी 5 शेंगा घ्या आणि त्यांचे तुकडे करा. या शेंगा दीड कप पाण्यात उकडा आणि एक कप शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा. हे पाणी सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळी 4 ते 5 वाजता पिऊ शकता.

मेथीच्या बिया

शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी मेथीच्या बिया सुद्धा खूप फायदेशीर मानल्या जातात. मेथीच्या बियांमध्ये डायटरी फायबर असतं. या बियांमुळे तुमची भूक कंट्रोल होते, कोलेस्टेरॉल कमी होतं आणि सोबतच शुगरही कंट्रोल राहते. मेथीच्या बियांचं पाणी करण्यासाठी एक चमचा मेथीच्या बिया घ्या. या बिया एक कप पाण्यात उकडा. हे पाणी गाळून सकाळी उपाशीपोटी प्यावं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago