महाराष्ट्र

दस्त नोंदणीच्या आधी जमीन मोजणी बंधनकारक; नोंदणी झाल्याशिवाय फेरफार नाही

औरंगाबाद: आता महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्री किंवा दस्त नोंदणी करण्याआधी जमिनीची मोजणी करणे बंधनकारक असेल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही नवी पद्धत लागू केली जाणार आहे.

खासगी एजन्सीमार्फत जमिनीची मोजणी

राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सी नेमल्या जाणार आहेत.

या एजन्सींच्या भूकरमापकांमार्फत जमिनीची मोजणी केली जाईल.

मोजणी पूर्ण झाल्यानंतरच दस्ताची नोंदणी करता येईल.

दस्त नोंदणीशिवाय फेरफार नाही.

दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार (Mutation) होणार नाही.

यामुळे बनावट दस्त, चुकीची नोंदणी किंवा फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

शेतकऱ्यांच्या वादाला आळा बसेल आणि पारदर्शकता वाढेल.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

1) जमिनीच्या मोजणीमुळे वाद आणि गोंधळ कमी होईल.

2) दस्त नोंदणी व फेरफार प्रक्रिया पारदर्शक होईल.

3) बनावट कागदपत्रांवर आधारित जमीन खरेदी-विक्री थांबेल.

4) शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.

5) नोंदणी प्रक्रिया जलद आणि खात्रीशीर होईल.

सरकारच्या या नव्या निर्णयामुळे जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल. आणि शेतकऱ्यांचे हित जपले जाईल. महाराष्ट्रात आता “जमीन मोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही” हा नियम पाळावा लागणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

6 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

6 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

6 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

6 तास ago

डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…

6 तास ago

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…

8 तास ago