आरोग्य

रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो

फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड असते. फळाचा आतला भाग पांढरा आणि मलाईदार आहे, तर तुम्ही रोज रामफळाचे सेवन केले तर काय होईल? तुम्ही रोजच्या आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला कोणते फायदे मिळतील? मधुमेही रामफळाचे सेवन करू शकतात का? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. रामफळाचे दररोज सेवन केले जाऊ शकते. कारण या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ सारखी पोषक तत्वे आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारखी खनिजे असतात.

रामफळातील व्हिटॅमिन सी कंटेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास योगदान, तर आहारातील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन नियमित पचन होण्यास मदत करतात. रामफळात असणारे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

रामफळ खाणे मधुमेहींसाठी योग्य ठरेल का

या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः कमी ते मध्यम प्रमाणात म्हणजे ५४ टक्के आहे, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्ती सामान्यतः हे फळ खाऊ शकतात, पण अगदी कमी प्रमाणात. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. पण, रामफळाचे जास्त सेवन केल्यावर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

रामफळ अनेक आरोग्य फायदे देत असले तरीही संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण रामफळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पाचन समस्या किंवा पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

57 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

59 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago