आरोग्य

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षण कोणती

आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज होण्याला कोरोनरी आर्टरी डिजीज अस म्हटलं जात.

हृदयात ब्लॉकेजची लक्षण कोणती 

मळमळ आणि अपचन

जर छातीत वेदनेसोबत पुन्हा पुन्हा उलटी झाल्यासारखं वाटत असेल किंवा पचन तंत्र बिघडलं असेल तर हा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा.

पायांमध्ये वेदना आणि सूज

जर पायांमध्ये वेदना आणि सूज दिसत असेल तर हा सुद्धा हृदयामध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराच्या खालच्या भागात तरल पदार्थ जमा होतात. त्यामुळे गुडघे आणि शरीराच्या खालच्या भागात वेदना होतात आणि सूज येते.

थकवा आणि चक्कर येणे

तुम्हाला जर पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल आणि काही न करता खूप थकवा जाणवत असेल तर हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. अशावेळी हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे चक्कर येतात आणि थकवा जाणवतो.

श्वास घेण्यास समस्या

एखादं हलकं काम केलं किंवा थोडंही चाललं तरी श्वास घेण्यास समस्या होत असेल तर ही काळजी करण्याची बाब आहे. हा नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते.

छातीत वेदना

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असेल तर छातीत वेदना होणं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

10 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago